1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 जुलै 2022 (20:14 IST)

अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला

Satyanarayan Toshneyar
अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह 100 फूट दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
अकोलाचा भाविक अमरनाथ यात्रेत 100 फूट दरीत कोसळला अकोला जिल्ह्यातील जम्मू काश्मीर येथे अमरनाथ यात्रेला गेलेले सत्यनारायण तोष्णेयार हे खेचरासह 100 फूट दरीत कोसळून जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे. लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अकोलाचे सत्यनारायण तोष्णेयार आपल्या पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावरून बसून परतीच्या प्रवासाला निघाले असता बारारीमार्गावर त्याच्या खेचराचा तोल गेला आणि सत्यनारायण तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने 100 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने भारतीय लष्कराच्या बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले आणि त्यांना सैन्यदलाच्या शिबिरात हलवले.आणि लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

अकोलाचे सत्यनारायण तोष्णेयार आपल्या पत्नी आणि मुलीसह अमरनाथ यात्रेला गेले होते. ते खेचरावरून बसून परतीच्या प्रवासाला निघाले असता बारारीमार्गावर त्याच्या खेचराचा तोल गेला आणि सत्यनारायण तोष्णेयार सिंध नदीच्या दिशेने 100 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने भारतीय लष्कराच्या बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवले आणि त्यांना सैन्यदलाच्या शिबिरात हलवले.आणि लष्कराच्या जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.