रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जानेवारी 2024 (12:44 IST)

दवाखान्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला, डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल

death
मुंबईच्या मालाड मधील एका क्लिनिक मध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी क्लिनिकच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन मुलीच्या आईनं सांगितले की मुळीं आत्महत्या केली नाही तर मुलीवर क्लिनिकच्या डॉक्टरांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीचा मृतदेह 28 डिसेंबर रोजी आढळला.पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर कुरार पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. 

मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार,पोलिसांनी क्लिनिकच्या डॉक्टरच्या विरोधात  बलात्कार आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.   
 
Edited by - Priya Dixit