मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 फेब्रुवारी 2024 (15:10 IST)

पोलिसाची पोलिस स्टेशन मध्येच आत्महत्या

नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक नजन  असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. मयत अशोक नजन  हे अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. यांनी पोलीस ठाण्यात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडलाय आहे. ते अतिशय शांत व सोज्ज्वळ स्वभावाचे होते. 
सकाळी दहावाजेच्या सुमारास त्यांनी केबिन मध्ये बसलेले असता त्यांनी स्वतःवर गोळी झाडली.

या मध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दररोज प्रमाणे ते ठाण्यात आले आणि त्यांनी सहकाऱ्यांशी बोलून आपल्या केबिन मध्ये गेले आणि स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर ने गोळी झाडली. त्यांनी आत्महत्या का केली अद्याप हे समजू शकले नाही. त्यांच्या केबिन मध्ये हजेरी बुक घेऊन गेलेल्या एका कर्मचाऱ्याला ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती मिळतातच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या जवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यांनी आत्महत्या केल्यामुळे अंबड मध्ये खळबळ उडाली आहे. 
 
 Edited by - Priya Dixit