शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (10:02 IST)

नाशिक : काय म्हणता आता टोमॅटोच्या नावाखाली परदेशात कांद्याची तस्करी, वाचा संपूर्ण बातमी

onion
नाशिकमध्ये  टोमॅटोच्या नावाखाली परदेशात कांद्याची तस्करी होत असल्याची घटना समोर आली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये  82.93 मॅट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता. नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटोच्या पेट्यांमागे कांदा पॅक करुन  युएईला पाठवण्यात येत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या टीमला मिळाली होती. 
 
त्यानुसार, टीमने सापळा रचला होता. त्यानसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा कांदा जप्त करत कारवाई केली आहे. नाशिकच्या दोन निर्यातदारांनी टोमॅटोच्या कंटेनरमध्ये टोमॅटो पेट्यांमागे कांदा पॅक करुन युएईला पाठवण्याची तयारी केली होती. मात्र, सीमा शुल्क विभागाच्या नागपूरच्या टीमने मुंबईला जाऊन कंटेनरची तपासणी केली. तेव्हा कंटेनरच्या समोरच्या भागांमध्ये टोमॅटो बॉक्स होते, तर त्यामागे कांद्याची पोती लपवून तो युएईला पाठवण्यात येत असल्याचे आढळून आले.
 
दरम्यान केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय 8 डिसेंबरला घेतला होता. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता.  भारताचा कांदा हा विविध देशांमध्य निर्यात केला जातो. भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी देखील आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. मात्र, अचानक सरकारनं निर्यातबंदीचं हत्यार उपसलं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 

Edited By -Ratnadeep Ranshoor