गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2023 (07:45 IST)

कस्टम विभागाची मोठी कारवाई: नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक

arrest
नागपूर: सोने तस्करी करण्याचा अत्यंत धक्कादायक असा प्रकार नागपूर शहरातून समोर आला आहे. दोन तरुणांनी दुबई येथून आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये तब्बल २ किलो सोन्याची पेस्ट लवपून आणली होती. या तरुणांच्या हालचालींवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांची झाडझडती घेतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याचा प्रकार समोर आला आहे. कस्टम विभागानं नागपूर विमानतळावर कतारवरुन आलेल्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 87 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. मोहम्मद शाहिद आणि पीरबाबा सौदागर अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत.
 
कस्टम्स विभागातील अधिकाऱ्यांना दोघेजण सोन्याची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मंगळवारी पहाटे कतर मधून आलेल्या विमानातून ते नागपूर विमानतळावर दाखल झाले होते. त्या आधारे दोघांची तपासणी केली असता दोघांनी शरीरावर घातलेल्या कपड्यात पावणे दोन किलो सोनं पेस्ट स्वरूपामध्ये लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.  
 
कस्टम्स विभागाचे अधिकारी दोघांच्या सीडीआरची तपासणी करत असून त्याद्वारे पुढील लिंक्स उघडकीस येण्याची शक्यता आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी कोठून होत होती याचा तपास सुरू आहे.