शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (07:43 IST)

जितेंद्र आव्हाडांच्या राष्ट्रवादीला सुरुंग? नरेश म्हस्केचे सूचक ट्विट

jitendra awhad
शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे  यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या  काही पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड  यांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला हेदेखील होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यातील काही राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या भेटीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी सूचक ट्विट केले.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त मुंब्र्यामध्ये काही पोस्टर झालेले होते. मात्र, यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले होते. यानंतर ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल अनेक नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नजीब मुल्ला यांचादेखील समावेश असल्याचे हा जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का मनाला जात आहे.

दरम्यान, येत्या १२ फेब्रुवारीला ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील काही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नजीब मुल्ला कुठेही जाणार नाही, असे स्पष्ट सांगितले होते. तसेच, भाजप आणि शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी कोटींची ऑफर केली जात असल्याचे आरोपही त्यांच्याकडून करण्यात आले होते. त्यामुळे आता ठाण्याच्या राजकारणात काय उलथापालथ होते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor