मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 19 जून 2018 (08:21 IST)

आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून प्रसिद्धी मिळवलेले मराठी अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांना 'मुंबईचा सिद्धिविनायक' पावला आहे. बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने केले आहे. बांदेकर हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, राज्य शासनाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

शिवसेना पक्षप्रुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अतिम शहा यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान शिवसेनेला केंद्रात आणि राज्यात आणखी मंत्रिपदे देण्याबाबत सकारात्क चर्चा झाली होती.
 
अभिनय ते राजकारण...
 
आदेश बांदेकरांनी अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बांदेकर यांच्याकडे सध्या शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे. बांदेकर यांनी दादरमधून शिवसेनेच्या तिकिटावर 2011 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेचे नितीन सरदेसाई यांनी बांदेकरांचा पराभव केला होता.