रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (11:24 IST)

केळझर येथील जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

9 मार्चला मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास वर्धा केळझर येथील दोन जिवलग मित्र दुचाकीने नागपूरवरून परत येत असताना आसोला गावाजवळ अपघात झाला. अपघातात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दोघांच्याही पार्थिवावर एकाचवेळी केळझर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
जगदीश सुनील साखरकर, जयंत केशव मुजबैल असे मृत युवकांची नावे आहे. जगदीश यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. वाहनांचे काही सुटे भाग आणण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास नागोसे नामक मित्राची दुचाकी जयंत मुजबैल या मित्राला सोबत घेत जगदीश नागपूरला गेला होता. काम आटोपून गावाकडे परतीच्या प्रवासात उशिरा रात्री नागपूर जिल्ह्यातील आसोला गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोन्ही जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गावात शोकाकुल वातावरण होते. मृतक जगदीश याच्या पश्चात आई आहे. तो एकमेव आधारा होता तर जयंत हा देखील एकुलता एक होता. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत.