शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (07:42 IST)

जामनेर तालुक्यात कुष्ठरुग्ण शोधासह सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम सुरु

जामनेर : तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भयेकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.जयंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. 2027 पर्यंत शून्य कुष्ठरुग्ण संख्या करणे व 2025 पर्यंत तालुका क्षयरोग मुक्त करणे या कार्यक्रमांतर्गत निदान न झालेले कुष्ठरुग्ण व निदान न झालेले क्षयरुग्ण यांना उपचाराखाली आणणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी सर्वेक्षण टीमला सहकार्य करून स्वतः पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून केले आहे.
 
कुष्ठरोगामध्ये अंगावर फिकट लालसर चट्टा, तेलगट चमकणारी त्वचा, अंगावरील गाठी, हातापायाला बधिरता अशी लक्षणे तर क्षयरोगामध्ये दोन किंवा अधिक कालावधीचा खोकला, दोन किंवा अधिक कालावधीचा ताप, वजनात घट होणे, भूक न लागणे, मानेवरील गाठी आदी लक्षणे दिसून येतात. तालुक्यात मोहिमेसाठी 252 टीम व पर्यवेक्षण करण्यासाठी 50 सुपरवायझर कार्यरत आहेत. टीमकडून 31 हजार 725 घरांमधील 3,09,157 नागरिकांची तपासणी केली जात आहे. आजतागायत1 लाख 23 हजार 327 नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये संशयित कुष्ठरुग्ण 383 व संशयित क्षयरुग्ण 132 आढळून आले आहेत.

Edited by -Ratnadeep Ranshoor