गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बाबाचा काट्यांवर झोपून अघोरी उपवास अंधश्रध्दा की प्रसिद्धीची हाव

कोण कशी प्रसिद्धी मिळवेल सांगता येत नाही. सध्या अमरावती येथील एक बाबा चर्चेत आहेत. त्यांनी बाभळीच्या काट्यावर झोपून तब्बल दीड दिवस अघोरी उपवास केल्याचं समोर आलं आहे. या बाबच नाव  मनिराम बाबा असं  आहे. हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा  ग्रामस्थांनी समजूत काढल्यानंतर बाबाने आपला उपवास मागे घेतला आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी गावात ही घटना घडली आहे. या बाबाने  बाभळीच्या काट्यांवर झोपून उपवास केला आहे. हा बाबा  गावातील कालीका मातेच्या मंदिरात ते पुजाअर्चा करत असतात. 

बाभळीच्या काट्यांवर झोपून उपवासाला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर बाबाने पोटावर दिवादेखील ठेवला होता. परंतु स्थानिक नागरिकांनी त्यांना काट्यावरुन उतरण्यास भाग पाडलं. उपवासावेळी मध्यप्रदेश आणि मेळघाट परिसरातील काही लोकही उपस्थित होते.त्यामुळे याला श्रद्धा म्हणाव की प्रसिद्धीची हाव हे कळत नाही