शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

विधवा का परिधान करतात पांढरे वस्त्र?

परंपरेनुसार पतीची मृत्यू झाल्यावर पत्नीने दुनियेतील सर्व रंगाचा त्याग करून पांढरे वस्त्र नेसावे आणि कोणत्याही प्रकाराचा आभूषण किंवा श्रृंगाराचाही त्याग करावा. परंतू वेदांमध्ये विधवेला सर्व अधिकार आणि दुसरा विवाह करण्याचादेखील हक्क प्रदान करण्यात आला आहे. वेद म्हणतात:
'उदीर्ष्व नार्यभि जीवलोकं गतासुमेतमुप शेष एहि।
हस्तग्राभस्य दिधिषोस्तवेदं पत्युर्जनित्वमभि सम्बभूथ।'
 
अर्थात कोणताही धर्म हे म्हणत नाही की पतीची मृत्यू झाल्यावर विधवेने त्याच्या आठवणीत पूर्ण जीवन व्यतीत केले पाहिजे. त्या स्त्रीला दुसर्‍या पुरुषाशी लग्न करून पुन्हा आपला संसार थाटण्याचा हक्क आहे.
 
तरी प्रश्न उद्भवतो की पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रिया का पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करतात?

जाणून घ्या त्याचे कारण....

पहिले कारण- पांढरा रंग अर्थात रंगहीन. ज्याच्या जीवनात रंग नसतो ते पांढरा रंग धारण करतात. संन्यासीदेखील पांढर्‍या रंगाचे वस्त्र धारण करतात. जेव्हा पतीची मृत्यू होते तेव्हा एका स्त्रीसाठी ही फार मोठी घटना असते. याचा अर्थ असतो की आता तिच्या जीवनात कोणताच रंग नाही.
 
दुसरे कारण- पांढरी साडी नेसल्याने त्या महिलेची वेगळी ओळख निर्माण होते. समाजात तिच्या प्रती संवेदना निर्माण होते. या मनोवैज्ञानिक प्रभावामुळे ती सामाजिक सुरक्षेत राहते.
 
तिसरे कारण- पांढरा रंग आत्मविश्वास आणि बळ प्रदान करतं. हा रंग कठिण काळ सुरळीत पार पाडण्यात मदत करतं. तसेच पांढरा रंग विधवा महिलांना प्रभूमध्ये लीन होण्यासाठी प्रेरित करतं. या रंगाचे वस्त्र धारण केल्याने मन शांत आणि सात्त्विक राहतं.

चौथे कारण- विधवा महिलांचे मन विचलित होऊ नये म्हणून ही परंपरा सुरू केली असावी. कारण रंगीन परिधान भौतिक सुखांबद्दल संकेत देतात. परंतू मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विधवांना पांढरे वस्त्र घालायचा सल्ला दिला गेला असावा.
 
पाचवे कारण- शास्त्रांमध्ये पतीला परमेश्वराचे रूप मानले आहे. अशात पतीची मृत्यू झाल्यास महिलांना सांसारिक मोह- मायेचा बंधनातून मुक्त होऊन देवात मन लावले पाहिजे.
 
सहावे कारण- असे मानले आहे की अपत्याच्या जन्मानंतर पतीची मृत्यू झाली तर दुसर्‍यांदा विवाह न केल्याने मुलांच्या जीवनावर विपरित प्रभाव पडत नाही. त्यांच्यात नैतिकता आणि आपल्या वडिलांप्रती जबाबदारी आणि संवेदनांचे भाव उत्पन्न होतात. हे एक इमानदार प्रयत्न असल्याचे मानले गेले आहे.