रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2017 (09:20 IST)

वाघ कुटुंब गोव्यात सुखरुप

अकोल्यातील बेपत्ता बिल्डर अमित वाघ आणि त्यांचे  कुटुंब गोव्यात एका हॉटेलमध्ये सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून वाघ कुटुंब बेपत्ता होतं. अमित वाघ हे साताऱ्याला सासुरवाडीला गेले होते. मात्र 13 जूनच्या रात्रीपासून कुटुंबीयांसह त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अमित वाघ, त्यांची पत्नी प्रियंका आणि शाश्वत आणि स्पंदन या दोन मुलांचा सातारा पोलिस शोध घेत होते. वाघ कुटुंब अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते.