गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (21:23 IST)

अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं

amit thackare
मनसे नेते अमित ठाकरे यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करावा यासाठी अमित ठाकरे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. 
 
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
 
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळींसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून विसरुनच गेलोय. गेल्या अनेक वर्षापासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशी असं अमित ठाकरे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor