शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:01 IST)

अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा; पुन्हा बसणार उपोषणाला

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेयांनी राज्यातील ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे,त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही.त्यामुळे जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लोकायुक्त कायदा लागू करावा अशी मागणी अण्णा हजारे यांच्याकडून करण्यात येत आहे.
 
अण्णा हजारे  म्हणाले की,जनतेकडे सर्वाधिकार मिळाल्याने भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर लोकपाल व लोकायुक्त कायदा खूप प्रभावी व सक्षम असा कायदा आहे.जनतेने जर मुख्यमंत्री, आमदार,अधिकारी यांच्याविरोधात सक्षम लोकायुक्ताकडे पुरावे दिले तर त्यांची चौकशी करून कारवाई करतील इतका प्रभावी व सक्षम असा हा कायदा आहे.मात्र, राज्य सरकार त्याकडे चालढकल करत असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे.
 
पुढे बोलताना अण्णा हजारे  म्हणाले, करेंगे या मरेंगे असं म्हणत आम्ही 2011 मध्ये आंदोलन केलं होतं.केंद्रामध्ये लोकपालला सरकार घाबरलं होतं, जेव्हा देशभरात आंदोलन झाल्यानंतर मान्य केलं.तर,आतापासून आम्ही कार्यकर्त्यांना कळवत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांना सांगत आहोत, आंदोलनाच्या तयारी लागा.हे सरकारचं बघू (महाविकास आघाडी सरकार),आता सप्टेंबर आहे,आम्ही एक नोटीस देणारआहोत,त्यानंतर एकाच वेळेला राज्यभरात मोठं आंदोलन करणार आहोत,अंहिसेच्या मार्गाने हे आंदोलन करणार आहोत,असं देखील अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.