मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (14:18 IST)

मालेगावात ATSची पुन्हा कारवाई; PFIच्या मैलानाला अटक

arrest
नाशिक – दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मालेगावात पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)या संघटनेच्या मौलाना इरफान दौलत नदवी (वय ३५) याला एटीएसने अटक केली आहे. नदवी याला तातडीने नाशिक जिल्ह्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यापूर्वी मालेगावमधून पीएफआयच्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे. नदवी हा सातवा संशयित आहे. मौलाना नदवी हा इमाम कोन्सिलचे अध्यक्ष आहे. पीएफआयशी संबंध असल्याच्या संश्यावरून नाशिक न्यायालयाने त्याला २८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एटीएसकडून नदवी याची कसून चौकशी केली जाणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor