शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2024 (08:47 IST)

बाळासाहेब थोरातांचा राजकीय वारसदार ठरला

मुलांसोबतच आता राजकीय नेत्यांची मुलीही आपल्या पित्याचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी मैदानात उतरत असल्याचं चित्र अलीकडच्या काळात दिसून येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची कन्याही आता राजकारणात सक्रीय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण जयश्री थोरात यांची आज संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हेदेखील काँग्रेसमध्ये होते. थोरात कुटुंबाचं संगमनेर विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक दशकांपासून एकहाती वर्चस्व राहिलं आहे. याच मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे सलग तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळलेले थोरात हे राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अशा स्थितीत त्यांनी आपली कन्या जयश्री थोरात यांना तालुका स्तरावर सक्रिय करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor