मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (11:23 IST)

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बँकेत गहाण

बँकेतून कर्ज घेण्यासाठी काही जण आपले दागिने गहाण ठेवतात, तर काही जण घर, शेत गहाण ठरवतात. पण कर्जासाठी आरोग्य केंद्राची इमारत बँकेत गहाण ठेवल्याची धक्कादायक माहिती हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथून मिळाली आहे. शेतकऱ्याकडून आरोग्यकेंद्रासाठी घेतलेली जमिनीवर शेतकऱ्याने बँकेच्या कर्मचाऱ्याला धरून पाच लाखाचे कर्ज घेतले आहे. 

शंकर राव देशमुख असे या कर्जासाठी आरोग्य केंद्राची इमारत गहाण ठेवणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या आरोग्य केंद्राचे उदघाटन हिंगोली जिल्हा परभणीत समाविष्ट असताना तत्कालीन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री रजनीताई सातव यांच्या हस्ते करण्यात आले होते. 
 
ज्या शेतकऱ्यांकडून आरोग्य केंद्राची ही इमारत बांधण्यासाठी शेतीची जागा विकत घेतली त्या जमिनीचा सातबारा त्या शेतकऱ्यांच्या नावावरच राहिला. त्याचा फायदा घेत या शेतकऱ्याने बँकेतून बँकेच्या एका कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन पाच लाखाचे कर्ज काढण्यासाठी चक्क आरोग्य केंद्रच गहाण ठेवले.
 
मुख्य म्हणजे या प्रकरणात अधिकारी किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही कागदपत्रांची पाहणी न करता कर्ज प्रकरणे मंजूर कसे केले या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता या प्रकरणात लवकरात लवकर काय कारवाई करण्यात येते या कडे लक्ष लागले आहे. बँकेची दिशाभूल करून संधीचा फायदा घेणाऱ्या या शेतकऱ्यावर कोणती कारवाई केली जाणार आणि तसेच या प्रकरणात बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सर्वांचे लक्ष वेधले असून त्यांच्या कामावर शंका निर्माण झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची ही इमारत कर्जासाठी गहाण ठेवल्याने गावात ही चर्चा रंगली आहे.