रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (10:00 IST)

येथे आहे देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

औरंगाबाद येथे क्रांती चौकात बसविण्यात आलेल्या देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात मोठा 21 फुट उंच अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज होणार आहे. हा पुतळा देशातील सर्व उंच पुतळा असून त्याची उंची 52 फूट आहे. या पुतळ्याचे अनावरण आज रात्री 10:30 ते 11:30 दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. हे अनावरण ऑनलाईन माध्यमातून करण्यात येणार आहे. रात्री 12 वाजे पर्यंत हा सोहळा सुरु असण्याचे सांगण्यात आले आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाईन उपस्थित राहणार. 

मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की या अनावरण सोहळ्याला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ,केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार. या सोहळ्यासाठी रात्री 12 वाजे पर्यंत वाद्य आणि साउंड सिस्टीमला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी देण्यात आली आहे.