शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 ऑगस्ट 2022 (16:27 IST)

Beed Accident : लग्नाला जाताना कुटुंबाचा अपघात, 6 जागीच ठार

accident
बीडच्या पाटोदा-मांजरसूंबा रोडवरील पाटोद्याजवळ बामदळे वस्ती जवळ स्विफ्ट डिझायर आणि आयशर टेम्पोची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळतातच पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्ये घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी अपघातातातील व्यक्तींना बाहेर काढले. अपघातात ठार झालेल्या कुटे कुटुंबियांचे हे सहा सदस्य पुणे येथून आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी केज तालुक्यात जीवाचीवाडी येथे जात असता पाटोदा शहर जवळ बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्या सुमारास आयशर टेम्पो आणि कुटे कुटुंबियांच्या स्विफ्ट कार वर टेम्पो चढून भीषण अपघात झाला. टेम्पो कारवर चढल्यानं कारपूर्णपणे दाबली गेली या अपघातात कारचा चक्काचूर झाला. आणि त्यात बसलेल्या कुटे कुंटुंबीयातील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गाडीतील सर्वांचा शरीराचा चेंदामेंदा झाला होता. त्यांना कारमधून काढण्यासाठी टेम्पो ला कारवरून काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. नंतर मृतदेह बाहेर काढता आले. पोलीस अपघाताचा तपास करत आहे.