शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2017 (12:42 IST)

थेट कॅशियरच्या केबिनमधून 12 लाख रुपये लांबवले

बेळगावमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमधून 12 लाख रुपये लांबवल्याची घटना किर्लोस्कर रोड शाखेत घडली. थेट कॅशियरच्या केबिनमध्ये प्रवेश करुन तिथल्या ड्रॉव्हरमधून रोकड लांबवली. एकूण पाच ते सहा जणांच्या टोळीने हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे चोरटे तामिळनाडूचे असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
 

सकाळी बँकेचे व्यवहार सुरु झाले. त्यानंतर बँकेत आलेल्या चार ते पाच जणांनी, बँकेच्या सगळ्या कॉऊंटरवरील कर्मचाऱ्यांना माहिती विचारण्याच्या निमित्ताने बोलण्यात गुंतवून ठेवलं. नंतर कॅशियरचेही लक्ष विचलित केलं. त्यावेळी काऊंटरच्या आत गेलेल्या एकाने केबिनमधील ड्रॉव्हरमधून बारा लाखाची रोकड उचलली आणि पोबारा केला. अडीच तासांनंतर बारा लाख रुपये चोरट्यांनी लांबवल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली.