वीज चोरी ची भन्नाट आयडिया ! टाचणीने केली वीज चोरी
टाचणी चा वापर आत्ता पर्यंत कागदला जोडण्यासाठी केला जात होता. पण या टाचणीने विजेची चोरी देखील होऊ शकते .हे प्रथमच ऐकायला मिळाले आहे. वीज चोरी होऊ नये या साठी विद्युत महावितरण मंडळ नाना प्रकारचे प्रयत्न करत असते. पण वीज चोरी करणारे काही न काही अद्दल लावून वीज चोरी करतच असतात. अशीच वीज चोरीचे प्रकरण झाले आहे औरंगाबादच्या नारेगाव येथे. येथे एका कारखान्यात वीज चोरी केली जात होती आणि ते देखील एका लहान टाचणीचा वापर करून . आणि या कारखान्यात तीन लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले.
असे आहे प्रकरण
औरंगाबादच्या नारेगावात अनेक कारखाने आहे. इथे असलेल्या सिसोदिया इंडस्ट्रियल
इस्टेट मध्ये हिलाबी इंजिनियरिंग म्हणून प्लास्टिक बॉटल तयार करण्याचा कारखाना आहे. महावितरण चिकलठाणा एमआयडीसीचे अधिकारी सतीश दिवे या ठिकाणी वीज बिलाच्या वसुली साठी गेले असता त्यांनी वीजमीटर कडे बघितल्यावर ते त्यांना बंद स्थितीत आढळले . ते जवळ गेल्यावर त्यांनी जे पहिले त्यामुळे त्यांना धक्काच बसला .टाचणीने वीजमीटर बंद केले होते. त्याचा डिस्प्ले बंद करण्यात आला होता. टाचणी मीटरच्या स्क्रोल बटनावर लावण्यात आली होती ज्यामुळे मीटरचे डिस्प्ले बंद होते. वीज वापरण्याची नोंद झाली नाही. वीज चोरीची अशी भन्नाट आयडिया बघून ते चक्रावले. वीज मीटर प्रयोगशाळेत पाठवले त्यात वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये बदल करण्यात आल्याचे समजले. पोलिसात तक्रार करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.