1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 4 डिसेंबर 2019 (15:07 IST)

भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत - आमदार प्रकाश गजभिये

Bhima Koregaon and Indu Mill Movement should stop crimes against Ambedkari activists - Gajbhiye
मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्याकडे दिले निवेदन, गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन...
 
भीमा कोरेगाव व इंदू मिल आंदोलनातील आंबेडकरी कार्यकर्ते व युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
 
भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय इंदू मिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत. तेही गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा अशी मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे.दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आश्वासन दिले.