गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:42 IST)

भोंदू मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले पोलिसांच्या ताब्यात

Bhondu Manoharmama alias Manohar Bhosale in police custody Maharashtra News Regional Marathi News In Marathi Webdunia Marathi
संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मनोहर उर्फ मामा भोसले (वय 39,रा.उंदरगाव,ता.करमाळा,जि.सोलापूर) याला पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी साताऱ्यात पकडले.त्याला ताब्यात घेण्यात आले असून लवकरच अटक केली जाणार आहे.पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली.
 
बारामतीतील शशिकांत सुभाष खऱात याच्या वडीलांच्याआजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला,साखर,भंडारा खाण्यास दिला.विशाल वाघमारे,शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.
 
मनोहर भोसले,विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि औंकार शिंदे या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ठ वअघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.