मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (22:47 IST)

साहित्य संमेलनात भुजबळ – फडणवीस वाद , शिवसेना कसली सावरकरांची वारसदार ? – फडणवीस

शिवसेना कसली सावरकरांची वारसदार, त्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात  माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते नाशिकमध्ये  पत्रकारांशी बोलत होते. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ते नाशकात दाखल झाले. मात्र संमेलनाला जाणे त्यांनी टाळले. या पार्श्वभूमीवर बोलतांना ते म्हणाले की आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचं योग्य सन्मान होणार नसेल तर तेथे जाऊन काय करायचे? असा सवाल त्यांनी केला.
शिवसेनेवर बोलतांना ते म्हणाले की शिवसेना म्हणते आम्ही सावरकर वारसदार आहोत, अरे कसले वारसदार? दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले, तेव्हा माफ़ी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे शिवसेना सदस्य म्हणाले मग कशावरून शिवसेना सावरकरांची वारसदार असेल? असा सवाल त्यांनी केला.