सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (21:39 IST)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आगामी वर्षात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक हे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोणत्या परीक्षा आगामी वर्षात घेतल्या जाणार आहेत. यांसंदर्भातील माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देण्यात आली आहे. राज्य सेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा , महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा , महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा आणि इतर परीक्षांचे आयोजन केलं जाणार आहे.
एमपीएससी राज्यसेवा परीक्षेला २ जानेवारी २०२२ पासून सुरूवात होणार आहे. तर परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही २५ ऑक्टोबर रोजी आहे. आज एमपीएससी प्रशासनाकडून कोणत्या मुख्य परीक्षा होणार आहेत. तसेच त्या किती तारखेला होणार आहेत. यांसंदर्भातील माहिती एमपीएससी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अंदाजित वेळापत्रकाबाबतची अद्ययावत माहिती ही वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आलंय. परीक्षेसंबंधीचा अभ्यासक्रम, निवड पद्धत आणि परीक्षेची परीक्षायोजना कशी असेल, इ. बाबतीचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, वेळापत्रक अंदाजित असल्यामुळे जाहिरातीच्या किंवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकमध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता आयोगाकडून वर्तवण्यात आली आहे. परंतु परीक्षेमध्ये काही बदल केल्यासं ते आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.