रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (12:23 IST)

राज्य सरकार चा मोठा निर्णय , सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य

सर्व माध्यमांच्या शाळांना आता मराठी विषय बंधनकारक असल्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत .या वर्षांपासून इयत्ता पहिलीपासून सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असेल .या सूचनेची अंमलबजावणी न केल्यास त्या शाळेच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार या साठी त्या माध्यमांच्या शाळांना रुपये एक लाख पर्यंतचा दंड आकारण्यात येईल .त्यामुळे आता सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी विषय शिकवणे बंधन कारक असणार .