मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (11:58 IST)

शिवसेनेला कुणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही - उदय सामंत

"ही बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशानं विचार करावा इतकं चांगले काम सुरू आहे. त्यामुळे कुणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला आवश्यकता नाही," असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
महाराष्ट्राला पार्ट टाईम मुख्यमंत्री नको, फडणवीसांसारखा फूल टाईम मुख्यमंत्री हवा, असं भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी म्हटलं होतं.
 
त्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, "टी. रवी यांना आपण ओळखत नाही. कधी निवडणुका घेतल्या तरी महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकणार. त्यामुळे टी. रवी यांची दखल घ्यावी असं मला वाटत नाही."