शुक्रवार, 22 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (12:05 IST)

उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, इतर मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात - देवेंद्र फडणवीस

No one considers Uddhav Thackeray as Chief Minister
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत मंगळवारी (16 नोव्हेंबर) ते बोलत होते.
 
"एक मुख्यंमत्री आहेत, त्यांना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, इतर काही मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतात, त्यामुळेच महाराष्ट्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे," अशी टीका फडणवीस यांनी केली.
 
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पण नंतर त्यांनी त्यांच्यावर एकामागून एक निशाणा साधला.
 
"आमच्या काळात प्रकल्पांवर चर्चा व्हायची. पण आज हर्बल तंबाखू, गांजा यांच्यावर चर्चा होते. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकार म्हणून यांची नोंद होईल," अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.