रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (23:59 IST)

मोठी बातमी ! आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी जागांवर निवडणूक होणार नाही-राज्य निवडणूक आयोग

सर्वोच्च न्यायालयाने  महाराष्ट्रातील नागरी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणावर  बंदी घातल्यानंतर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रने  एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आत्तापर्यंत ज्या जागा ओबीसींसाठी राखीव होत्या त्यावरील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील 106 नगर पंचायतींमधील 344 ओबीसी जागांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी राखीव जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या असतील, परंतु इतर जागांच्या निवडणुका वेळापत्रकानुसारच होतील.
राज्यातील 106 नगरपालिकांच्या एकूण 1 हजार 802 जागांसाठी या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 344 जागांवर ओबीसी आरक्षण सुरू होते.
भंडारा नगरपरिषदेच्या एकूण 52 जागांसाठी निवडणूक होणार होती. त्यापैकी 13 जागा ओबीसींसाठी राखीव आहेत. या जागांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेतील 53 पैकी 10 ओबीसी जागांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या एकूण जागा 105 झाल्या आहेत. यामध्ये आता एकूण 23 ओबीसी जागांवर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत