रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (11:10 IST)

शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर !

राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना, भाजपने मास्टरस्ट्रोक लावला आहे. 
 
एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार भाजपने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट राष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्याचं सांगितलं जातं आहे. ही बातमी हैराण करणारी असली तरी याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. संसद भवनात होणाऱ्या या भेटीत महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळासंदर्भात चर्चा होणार आहे.
 
राष्ट्रवादीने भाजपला समर्थन दिले तर अगदी सहजपणे ते सरकार स्थापन करतील असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. मात्र शरद पवारांकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून त्यांचे शिवसेनेवर अनेक टिकास्त्र सोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे जनतेलाही नेमकं काय घडणार याबद्दल भ्रम निर्माण होत आहे.
 
महाराष्ट्रात राष्ट्रवादीने भाजपला सत्तास्थापनेसाठी मदत केल्यास, राष्ट्रवादीला राज्यात आणि केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदं देण्यात येतील. शिवाय शरद पवारांना थेट राष्ट्रपतीपद मिळू शकतं, असे सूत्रांप्रमाणे कळून येत आहे.