शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजपाची मुंबईत निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाची तयारी सुरु केल्याचे दिसून येते. भाजपच्या निवडणूक समितीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार केली आहे.

भाजपकडे 2500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्या पहिली चाळण लावून 1769 यादी करण्यात आली. त्या नावांचा विचार करून समितीने 512 नावांची यादी तयार केली. काल रात्री ३ वाजता समितीची बैठक संपली. प्रत्येक वॉर्डासाठी २ ते ३ उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या निवडणुक समितीत 29 सदस्यांचा समावेश होता.त्यामुळे आता शिवसेना सोबत आली नाही तरी भाजपने सर्व तयारी केली आहे.आता शिवसेना काय करते हे पाहणे गरजेचे आहे.