शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (15:53 IST)

नवीकोरी दुचाकी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत घरी आणली

Kawasaki Z900
कोल्हापुरात एका तरुणाने आपली नवीकोरी दुचाकी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत घरी आणली आहे. कोल्हापूरातील कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने दीपावलीच्या मुहूर्तावर कावासाकी निंजा झेड एक्स 10 आर ही गाडी खरेदी केली. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने त्याच्या नव्याकोऱ्या बाईकची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली. 
 
या बाईकची किंमत एक दोन लाख नसून ऍक्सेसरीज धरून तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या किमतीची ही पहिलीच गाडी असल्याने त्याने आगळ्या वेगळ्या पद्धतीने जंगी स्वागत केलय. त्यामुळे या दुचाकी गाडीच्या स्वागताचे कोल्हापुरी भाषेत कौतुक केलं जातं आहे. राजेश चौगले हा शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करतो. त्याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. राजेशकडे बुलेट तसेच इतर स्पोर्ट्स बाईक आणि कार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच आता कावासाकी निंजा झेडएक्स रस्त्यावर धावताना दिसत आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor