मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 मे 2021 (16:09 IST)

चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?,” : जयंत पाटील

Chandrakant Patil
महाराष्ट्र झोपेत असतानाच महाविकास आघाडी सरकार जाईल. कळणारचं नाही, कधी गेलं,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर पलटवार केला. पाटील यांनी विधानावर “महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल आहे. चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?,” असं म्हणत जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.
 
जलसंधारण मंत्री जयंत पाटील हे  पुण्यात बैठकीसाठी आले होते. साखर संकुलात झालेल्या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर पलटवार केला. “पंतप्रधान मोदी यांच्यात देखील अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही. यावर चर्चा होऊ शकते. करोना असल्याने लोकप्रतिनिधी येऊ शकत नाही. संख्या वाढल्याने अधिवेशन आपण मर्यादित केले आणि तेच कारण राज्याला लागू आहे. सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.
 
“उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर पाटील म्हणाले, “सोलापुरकरांच्या उजनी धरणाच्या पाण्यावर जेवढा हक्क आहे. तो कोणीही हिरावून घेणार नाही. सोलापूर जिल्ह्याचा वाटेचं पाणी कुठेही जाऊ देणार नाही,” अशी माहिती त्यांनी दिली. “पॉझिटिव्ह रेट अनेक ठिकाणी खाली गेलेला आहे. जोपर्यंत हा रेट कमी होत नाही. तोपर्यंत संकट टळले असं म्हणता येणार नाही. तसेच ३० तारखेपर्यंत परिस्थिती बघून लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री निर्णय घेतील,” असंही पाटील यावेळी म्हणाले.