शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : बुधवार, 26 मे 2021 (15:52 IST)

भारत सरकारच्या विरोधात कोर्टापर्यंत पोहोचला WhatsApp, म्हणाले - नवीन कायद्यांमुळे गोपनीयता संपुष्टात येईल

भारत सरकारच्या आयटी नियमांच्या विरोधात फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग App व्हाट्सएप (WhatsApp) न्यायालयात पोहोचला आहे. नवीन नियमांमध्ये व्हॉट्सअॅप आणि तत्सम कंपन्यांना त्यांच्या मेसेजिंग अॅपवर पाठविलेल्या मेसेजच्या ऑरिजिनचा मागोवा ठेवावा लागेल, म्हणजेच ज्याठिकाणी हा संदेश प्रथम पाठविला गेला. या नियमांविरोधात कंपनीने 25 मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, व्हॉट्स अॅपच्या प्रवक्त्याने यासंदर्भात माहिती दिली की, 'मेसेजिंग Appला अशा प्रकारे चॅटचे या प्रकारे ट्रेस ठेवणे सांगणे हे WhatsAppवर पाठविलेल्या सर्व मेसेजवर लक्ष ठेवण्यासारखे आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन दूर करेल आणि लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करेल.
 
कंपनीने असेही म्हटले आहे की, 'यादरम्यान, कोणत्याही माहितीसाठी कायदेशीररीत्या विचारलेल्या कायदेशीर विनंतीस उत्तर देण्यासह लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही भारत सरकारशी बोलणी सुरू ठेवू.'