शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (07:47 IST)

सर्वाधिक तक्रारी येणाऱ्या खासगी हॉस्पिटलची सर्व बिले तपासा आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी  होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बिल आकारणी होते की नाही याबाबत दररोज तपासणी करावी. जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा. ज्या रुग्णांलयाबाबत जादा बिल आकारणीच्या जास्त तक्रारी आहेत त्या रुग्णालयांची प्रत्येक बिलाची तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिले आहेत.
 
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट विचारात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने उपाययोजना प्रभावीपणे राबवत संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. कोरोनाशी एकजुटीने सामना करू असा विश्वासही त्यांनी यावेळी  दिला.
 
गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, पहिल्या लाटेच्या तुलनेत आरोग्य विषयक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे निश्चितच फायदा होतो आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे सुविधा निर्माण झाल्या आहेत. म्युकरमायकोसीस या नवीन आजाराची भर पडली आहे. हा आजार अचानक उद्भवतो. त्याचे उपचार महागडे आहेत त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, पुणे जिल्ह्याने लसीकरणामध्ये आघाडी घेतली आहे. लसीकरणासोबतच कोरोना चाचण्या वाढविण्याची गरज आहे.कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी  होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बिल आकारणी होते की नाही याबाबत दररोज तपासणी करावी. जादा बिल आकारणी करणा-या रुग्णालयांवर कारवाई करा. ज्या रुग्णांलयाबाबत जादा बिल आकारणीच्या जास्त तक्रारी आहेत त्या रुग्णालयांची प्रत्येक बिलाची तपासणी करावी. असे निर्देश त्यांनी दिले.