मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (15:56 IST)

मुख्यमंत्र्यांकडून राजू शेट्टींना चर्चेसाठी निमंत्रण

पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांनाआज चर्चेसाठी निमंत्रण दिले.

कृष्णा व पंचगंगेच्या महापुराने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना केंद्र व राज्य शासनाने न्याय द्यावा.यांसह विविध मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाच दिवसांपूर्वी प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा आंदोलन सुरू केले होते.अखेर १५० किलोमीटर अंतर पार करून ही परिक्रमा नृसिंहवाडी येथे पोचली.सरकारने मागण्यांकडे लक्ष न दिल्यास नृसिंहवाडीत जलसमाधी घेण्याचा इशाराही शेट्टी यांनी दिलेला होता.