1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (15:50 IST)

सख्ख्या भावांचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

The unfortunate death of a number of brothers by drowning in farm wat Maharashtra News Regional Marathi News in Marathi Webdunia Marathi
नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंडगाव बुद्रुक येथील शेतकरी संतोष जगताप यांच्या शेततळ्यामध्ये त्यांची दोन मुले हर्षल संतोष जगताप (वय १३) व शिवा संतोष जगताप (वय ११) या दोन भावंडांचा शेततळ्याच्या पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष जगताप व त्यांच्या पत्नी शोभा जगताप या कामानिमित्त घराबाहेर असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाणी पाहण्यासाठी शेततळ्यावर शिवा हा अगोदर गेला.पण, पाऊस सुरु असल्यामुळे त्याचा शेततळ्यात पाय घसरला.त्याला वाचवण्यासाठी त्याचा मोठा भाऊ हर्षद गेला. पण, दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.सायंकाळी ही घटना घडली.पण,रात्री मुले घरी न आल्याने शेतकरी संतोष जगताप यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने परिसरात शोधाशोध सुरू केली.त्यानंतर दोन्ही भावांचा मृतदेह त्यांना शेततळ्यात आढळून आला.रात्री उशिरा खासगी वाहनांच्या साहाय्याने दोन्ही भावांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॅाक्टरांनी तपासणी केली.पण,त्यांचे प्राण अगोदरच गेले होते.या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.