रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बाप्पाला 1 हजार किलोचा चॉकलेट केकचा मोदक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त तब्बल 1 हजार 970 किलो मोदकाचा चॉकलेट केक साकारण्यात आला. या केकची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.  न-हे मधील द केक हाऊसच्या 16 जणांनी अवघ्या 8 तासात हा विक्रम केला आहे.  

बुधवारी (दि.23) दुपारी सुरु झालेली केक तयार करण्याची प्रक्रिया रात्री 11.30 वाजता संपली. केक साकारणारे मार्गदर्शक धर्मनाथ गायकवाड म्हणाले, केक करण्याकरीता 1 हजार किलो तयार केक पावडर, 1 हजार 100 किलो चॉकलेट ट्रफल आणि 50 लीटर क्रिम लागले आहे. केकचा आकार 23 बाय 35 फूट असून याकरीता 3 दिवसांपासून तयारी सुरु होती. याकरीता विविध केक सप्लायर्सनी देखील सहकार्य केले आहे.