शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जून 2017 (07:33 IST)

'मी मुख्यमंत्री बोलतोय' साठी प्रश्न पाठवा

दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा कार्यक्रम यावेळी 'सर्वांना परवडणारी घरे' या विषयावर होणार असून या कार्यक्रमासाठी दि. 27 जून पर्यंत प्रश्न पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रश्न पाठवून कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी जनतेला मिळणार आहे. आपले हे प्रश्न [email protected] या ई-मेल वर किंवा 8291528952 या क्रमांकावर व्हॉटस अपद्वारे रेकॉर्डिंग करून किंवा संदेश स्वरूपात आपल्या छायाचित्रासह पाठवता येतील. महारेरा, म्हाडा, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, शहरांचा विकास आराखडा, झोपडपट्टी पुनर्विकास योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास यांसारखे विविध विषय सर्वांना परवडणारी घरे या विषयावर आधारित असलेल्या या कार्यक्रमात समाविष्ट असतील.