बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 एप्रिल 2021 (15:48 IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला करोनावरील लसीचा दुसरा डोस

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाच्या लशीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यांनी मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये जाऊन दुसरा डोस घेतला आहे. ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोनावरील लशीचा पहिला डोस घेतला होता. 
 
मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्यमंत्र्यांचा लशीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या सोबत पहिला डोस घेतला होता. तर, आदित्य ठाकरे यांचीही करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते होम क्वारंटाइन असून घरीच उपचार घेत आहेत.
 
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही करोनावरील लशीचा दुसरा डोस घेतला आहे.