काँग्रेसची विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे राज्यातील २८८ मतदारसंघांतून ९०० इच्छुकांचे अर्ज आले असून २९ जुलैपासून जिल्हास्तरावर मुलाखती होणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मित्र पक्षांनाही सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. सर्वांशी विचारविनिमय करूनच जागा वाटप आणि उमेदवार ठरविले जातील. २९, ३० आणि ३१ जुलै रोजी काँग्रेस पक्षातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आखण्यात आला असून मुलाखतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन निरीक्षक या प्रमाणे ७० निरीक्षक नेमण्यात आले आहेत. निरीक्षक आपला अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला सादर करतील. त्यानंतर राज्यस्तरीय कमिटीत त्यावर विचार केला जाईल, असेही थोरात यांनी सांगितले.