मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 16 जुलै 2019 (14:55 IST)

काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी?

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण? यावरून अनेक नावे चर्चेत आहेत. सूत्रानुसार, काँग्रेस पक्षाचे नेतृत्व पुन्हा एकदा सोनिया गांधींकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. परंतु, यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास सोनिया गांधींनी नकार दिला आहे.
 
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी राहुल गांधी यांनी घेऊन अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अनेक घडामोडींनंतर काँग्रेस पक्षाने अखेर राहुल गांधींचा राजीनामा स्वीकार केला. राहुल गांधींनी याआधीही काँग्रेस वर्किंग कमिटीला नवा अध्यक्ष निवडण्यासाठी १ महिन्याचा कालावधी दिला होता. परंतु, असे न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींना अध्यक्ष पदावर कायम राहण्यासाठी विनंती करण्यात आली.