'राणा दाम्पत्यात कॉंग्रेसला रस नाही'नाना पटोले यांची राणा दाम्पत्यावर टीका

nana patole
Last Modified शनिवार, 28 मे 2022 (22:02 IST)
नागपूर - भाजप खासदार नवनीत राणा आणि रवी राणा
यांना हनुमान चालीसा पठन करावेसे वाटत असेल तर आणि फक्त हाच प्रश्न महत्वाचा आहे असे वाटत असेल तर यात कॉंग्रेसला काहीही रस नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

यांनी दिली आहे. ते नागपूर विमातळावर माध्यमांशी बोलत होते.

जेलवारी केल्यानंतर तब्बल 36 दिवसानंतर राणा दाम्पत्य नागपूरमध्ये येत आहेत. कार्यकर्ते त्यांचे जंगी स्वागत करणार आहेत. त्यानंतर नागपूरच्या रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा
पठण करणार आहेत. याविषयी नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, मी हिंदू धर्माचा आहे. वारंवार सांगतो मी हनुमान चालीसा घरी वाचतो. आमचा धर्म आमच्या आस्थेचा विषय आहे. मला राणा दाम्पत्याबद्दल कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. तो आमचा विषय नाही. आम्ही धर्माचा आदर करतो, त्याची जाहिरात करत नाही.
तसेच, केंद्र सरकारने आठ वर्षात देश विकून देश चालवण्याचे काम केले आहे. देशाचे संविधान बद्दलवण्याचे काम चालू आहे. बेरोजगारी, महागाईच्या कचाट्यातून जनता बाहेर पडत नसताना हे सगळे प्रश्न असताना राणा दाम्पत्यात कॉंग्रेसला रस नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या अणखी एक विषय गाजतो आहे तो म्हणजे पोलिसांच्या बदल्या. पोलीस बदल्यांच्या यादीवर बोगस, वाळू तस्कर, गुड, बरा असा शेरा असल्याचा एक्सक्लुझिव्ह अहवाल 'लोकशाही' न्यूजच्या हाती लागला आहे. जालना जिल्ह्यातील (Jalana) विविध ठाण्यांसह शाखांतून मागील वर्षी 180 पोलिस (Police) कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यातील काही बदल्या लोकप्रतिधी, गुत्तेदारांच्या शिफारसीवरून झाल्या असल्याचे समजते आहे. यावर नाना पटोले यांनी सर्व विभागातील बदल्यांना स्थगिती दिलेली आहे, असे स्पष्ट केले आहे.


यावर अधिक वाचा :

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट

डिशच्या रिचार्जसाठी घटस्फोट
नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं होतच असतात. काही वेळा हे वाद ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी ...

धर्मवीर चित्रपटामुळे नात्याला तडा! उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर चित्रपटाचा शेवट पाहणं का टाळलं होतं?
13 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर : मुकाम पोस्ट ठाणे’या मराठी चित्रपटाच्या ...

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार

विधानसभेचे विशेष अधिवेशन 3 व 4 जुलै रोजी होणार
महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी ...

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या अशा शुभेच्छा
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ ...

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल

सिडकोत तरुणीवर बलात्कार;गुन्हा दाखल
नाशिक – सिडकोत तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल ...

आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेची घोषणा

आदित्य ठाकरे यांच्याकडून निष्ठा यात्रेची घोषणा
शिवसेनेची गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रेची घोषणा केली. आदित्य ठाकरे हे ...

नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच सेनेचं नुकसान ...

नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच सेनेचं नुकसान केलं-केसरकर
पक्ष नेतृत्वाला चुकीचे सल्ले देणाऱ्यांनीच शिवसेनेचं नुकसान केलं. अनेक गोष्टी संजय ...

नाशिकसह या चार शहरांमध्ये होणार ‘स्वनिधी सांस्कृतिक ...

नाशिकसह या चार शहरांमध्ये होणार ‘स्वनिधी सांस्कृतिक महोत्सव’;काय आहे तो?
केंद्रशासनाच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा यशोत्सव म्हणून या योजनेचे ...

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद
हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर ...

ठाकरे सरकारने शेवटच्या दिवशी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाला ...

ठाकरे सरकारने शेवटच्या दिवशी घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाला शिंदे सरकारची स्थगिती
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या दिवशी घेतलेल्या एका ...