शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (07:52 IST)

चुकीच्या उपचारांमुळे महिलेचा मृत्यू झाल्याने डॉक्टर दाम्पत्याला ग्राहक मंचचा दणका; ठोठावला लाखांचा दंड

death
लातूर : निष्काळजीपणे उपचार केल्यामुळे महिला रुग्णाचा मृत्यू झाला होता. या घटनेला जबाबदार असणार्‍या लातूरमधील डॉक्टर दाम्पत्याला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. या दाम्पत्याला 40 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला आहे.
 
लातूरमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. याबाबात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील नणंद या गावातील रेवती गावकरे ही 27 वर्षीय महिला मागील वर्षी घरकाम करताना पडली होती. उपचारासाठी त्यांना लातूर इथल्या डॉ. विक्रम सूर्यवंशी आणि डा.ॅ श्वेता सूर्यवंशी यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्येे दाखल करण्यात आले होते.
 
दुसर्‍या दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु शस्त्रक्रिया केल्यानंतर ती शुद्धीवरच आली नाही. यानंतर डॉक्टर दाम्पत्याने रुग्णाच्या नातेवाईकांना याबाबत माहिती न देता परस्पर दुसर्‍या रुग्णालयात हलवले. तिथे तपासणी झाल्यानंतर रुग्णाला मृत घोषित करण्यात आले होते.
 
मृत रेवती गावकरे यांना दोन लहान मुले आहेत. वडिलांकडे दोन्ही लहान मुलांना घेऊन त्या राहत होत्या. अचानकपणे मुलगी दगावली आणि दोन नातू सांभाळण्याची जबाबदारी तिच्या वडिलांवर आली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रेवतीचा मृत्यू झाल्याने त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या विरोधात रुग्ण हक्क समितीच्या सहकार्याने त्यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगात डॉक्टर दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली.
 
यावर प्रकरणावर कारवाई करत ग्राहक मंचाने अकरा महिने 28 दिवसात निर्णय दिला. निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचार पद्धतीमुळे रेवती गावकरे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युसाठी जबाबदार असणार्‍या डॉक्टर दाम्पत्याला दोन मुलांच्या उदरनिर्वाहासाठी चाळीस लाख रुपये द्यावेत, असा निर्णय ग्राहक मंचाने दिला.
Edited by : Ratnadeep Ranshoor