रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (22:07 IST)

सुट्टीवर आलेल्या पोलीस शिपायाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे पोलीस शिपाई गोरख मधुकर शेखरे (25) याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. शेखरे मुंबईतील भायखळा पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत असून काही दिवसांपुर्वीच तो सुटीनिमित्त गावी आला आहे. सोमवारी  रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरातील ओट्यावर भांडी घासण्याचे काम करीत होती़. यावेळी शेखरे याने पाठीमागून येऊन या मुलीचे तोंड दाबून तिला बाथरूममध्ये नेत तिच्यावर अत्याचार केला़. मुलीने आरडाओरड केल्याने तिचे भाऊ व कुटुंबिय तसेच नागरिकांना धाव घेतली. मुलीची शेखरेच्या ताब्यातून सुटका करून पोलीस शिपाई गोरख शेखरे यास चोप देत दिंडोरी पोलिसांच्या हवाली केले़. या प्रकरणी पिडीत मुलीने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेखरे विरोधात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को)अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़े़.