शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मे 2017 (11:25 IST)

उशिरा आल्याचा जाब विचारल्याने वडिलांची हत्या

कोल्हापुरातील विक्रमनगर शाहु कॉलनीत रात्री उशिरा घरी आल्याचा जाब विचारल्याच्या रागातून मुलानं वडिलांची हत्या केली आहे. आरोपी रफीक मुल्ला रोज रात्री उशिरा घरी येतो, या कारणावरुन सुरु झालेल्या वादाचं पर्यावसान भांडणात झालं. त्यातच घराचा दरवाजा लवकर न उघडल्याच्या रागातून रफीकनं स्वत:च्याच वडिलांची पिरसाब मुल्लांची हत्या केली आहे. धारदार चाकूनं वार केल्यानं पिरसाब यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी रफीक मुल्ला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.