रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:38 IST)

दहीहंडीवरील सुनावणी , उंचीचे सर्व निर्बंध मागे

दहीहंडीच्या थरांच्या उंचीवर घालण्यात आलेले उंचीचे सर्व निर्बंध मागे घेत असल्याचा, महत्त्वपूर्ण निकाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला. या निर्णयामुळे मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील दहीहंडी पथकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीच्या थरांवर आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या मुलांच्या वयावर न्यायालयाकडून काही निर्बंध लादण्यात आले होते. मात्र,  फेरसुनावणीदरम्यान न्यायालयाने हे दोन्ही निर्बंध शिथिल केले. त्यानुसार आता दहीहंडीच्या मनोऱ्यांची उंची किती असेल, याचा निर्णय विधिमंडळावर सोपवण्यात आला आहे. तर दहीहंडीत १४ वर्षांखालील मुले सहभागी होणार नाहीत, याची काळजी आम्ही घेऊ असे सरकारकडून सांगण्यात आले. त्याला हिरवा कंदील दाखवून कोर्टाने गोविंदांना मोठा दिलासा दिला आहे. १८ वर्षाखालील मुलांना गोविंदा पथकात न घेण्याचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिले होते. ती मर्यादा यंदा शिथील करण्यात आली आहे.