मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (11:02 IST)

पडळकरांच्या जीवाला धोका, त्यांना विशेष सुरक्षा द्या : देवेंद्र फडणवीस

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
 
फडणवीस यांनी या संदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पाठवले आहे. गोपीचंद पडळकर हे राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन करत असल्याने गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. 
 
गोपीचंद पडळकर सातत्याने राज्य सरकारवर टीका करताना दिसून येतात. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठीही ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून काही दिवसांपूर्वी पडळकर आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी सदर मागणी केली आहे.