मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 डिसेंबर 2023 (08:22 IST)

लिगो प्रकल्प साकारण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी

fauzia khan
परभणी : मराठवाड्यामध्ये हिंगोली येथे लिगो प्रकल्प केंद्र शासनाने मंजुर केला आहे. आंतरराष्ट्रीय नासा या संस्थेने निश्चित केल्यानुसार जगातील तिस-या क्रमांकाची गुरुत्वाकर्षणीय केंद्रबिंदू असलेली लिगो ऑब्झर्वेटरी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात स्थापित करण्याचे ठरविले आहे. त्यांनी या लिगो निरीक्षण प्रकल्पाद्वारे देशाचे विविध विषयातील महत्त्व अधोरेखीत होणार आहे.
 
देशाचे विज्ञान, विकास व संशोधन यात मोठी भर पडणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी केंद्र सरकारने एक स्वतंत्र समिती मार्फत आढावा घ्यावा. हे बांधकाम लवकरात लवकर कसे होईल यादृष्टीने समितीने उपाययोजना प्रस्तावित कराव्यात अशी मागणी खा. फौजिया खान यांनी राज्यसभेत केली आहे.
 
या निरीक्षणगृहासाठी शासनाने २६०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे सांगुन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी या केंद्राच्या भोवतालच्या परिसरात मोठे विज्ञान संशोधन केंद्र, विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठ तसेच इतरही काही महत्त्वपूर्ण संशोधन केंद्र या ठिकाणी स्थापित व्हावेत अशी मागणी केली. या माध्यमातून मराठवाड्याच्या व देशाच्या मध्यभागी असलेल्या अविकसित भागाचा विकास होण्यामध्ये निश्चितच मदत होणार आहे असे मत व्यक्त केले.
 
या प्रकल्पामुळे मराठवाडयातील युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होऊन या केंद्राच्या मान्यतेमुळे मराठवाड्याचा विकास होणार आहे. त्याबद्दल जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे खा. फौजिया खान यांनी सांगितले.