बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (20:27 IST)

नाशिक :मुद्रांक शुल्क अभय योजनेत "अशी" असेल सुट व सवलत

shinde panwar fadnavis
नाशिक : शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना 2023 लागु केली आहे. ही योजना 1 डिसेंबर, 2023 ते 31 जानेवारी, 2024 आणि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च, 2024 अशा दोन टप्प्यात लागु केलेली आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर, 2000 या कालावधीत नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्याबाबतीत शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपुर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत  लागु करण्यात आली आहे. अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दंवगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
 
अशी असेल सुट व सवलत…
 
1 जानेवारी, 1980 ते 31 डिसेंबर, 2000 या कालावधीतील दस्तांसाठी
 
योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपुर्ण माफी. तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात 50 टक्के व दंडाची संपुर्ण माफी.
 
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये 80 टक्के सुट. तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात 40 टक्के व दंडामध्ये 70 टक्के माफी.
 
1 जानेवारी, 2001 ते 31 डिसेंबर, 2020 या कालावधीतील दस्तांसाठी
 
योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 25 टक्के माफी व दंडाची रक्कम ही 25 लाखापेक्षा कमी असल्यास दंडामध्ये 90 टक्के माफी. तसेच दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 25 लाख रक्कम दंड म्हणून स्वीकारण्यात येऊन उर्वरीत दंडाच्या रक्कमेत माफी. देय होणारी मुद्रांक शुल्काची
 
रक्कम 25 कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के माफी तसेच दंडात 1 लाख रक्कम स्विकारुन उर्वरीत दंडाच्या रक्कमेत सुट.
 
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के व दंडामध्ये 80 टक्के सुट तसेच दंडाची रक्कम ही 50 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 50 लाख रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरीत दंडाच्या रक्कमेची सुट. देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्राक शुल्कात 10 टक्के माफी तसेच दंडात रुपये 2 कोटी रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरीत दंडाच्या रक्कमेची सुट देण्यात येणार आहे.
या अभय योजना 2023 चा लाभ घेण्यासाठी या कार्यालयामार्फत ज्यांना मुद्रांक शुल्क भरणेकामी नोटीस प्राप्त झालेली आहे.
 
त्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता आपला अर्ज  सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक पहिला मजला, नाशिक जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघ लि. यांची इमारत, व्दारका सर्कल, आग्रारोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253-2508853 या कार्यालयास सादर करावा आणि शासनामार्फत सुरु असलेल्या अभय योजना अंतर्गत दंड सवलत योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor